केज : दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाने, शेती वाटून नावावर करण्यास असहमती दर्शविल्याचा राग आल्याने आई-वडिलास मारहाण करून रात्रभर घरात डांबून ठेवल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास देवगाव येथे घडली.
या प्रकरणी मुलाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी सौदागर रामराव मुंडे (वय-७५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचा मुलगा उत्रेश्वर सौदागर मुंडे याने शुक्रवारी रात्री उशिरा दहा वाजेच्या सुमारास मद्यधूंद अवस्थेत स्वत:च्या आई आणि वडिलांना तुम्ही शेताची वाटणी करून माझ्या नावावर का करत नाहीत? असे म्हणून शिवीगाळ करत लाथा-बुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरच न थांबता त्याने दोघांना रात्रभर घरातील खोलीत डांबून ठेवल्याचे सौदागर मुंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी मुलगा उत्रेश्वर मुंडे याच्या विरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भालेराव हे करीत आहेत.
विहिरीत पडलेल्या पोटच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईने स्वतःचा जीव गमावल्याची तालुक्यातील एक घटना तर दुसरीकडे आई-वडिलांनी हाताची काडं करून कमावलेल्या जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या आई-वडिलांच्या जिवावर उठलेला पोटचा मुलगा, हा केवढा विरोधाभास आहे. वृद्धापकाळात काठीचा आधार असलेल्या पोटच्या मुलाकडून मिळालेल्या वागणूकीबद्दल समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या