एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले की, मी भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. आम्ही चार मिनार ओलांडल्यावर मी स्टेजकडे जात असताना राहुल गांधींचा ताफा आला, तेव्हा झालेल्या गर्दीमध्ये पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि मी एका बॅरिकेटजवळ पडलो. माझ्या डोळ्याला इजा झाली, रक्तस्त्राव होऊ लागला आणि मला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले.
तेलंगाणा : राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते नितीन राऊत’भारत जोडो’ यात्रेदरम्यान जखमी झाले आहेत.
हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले असताना गर्दीत त्यांना धक्का लागून पडल्याने ते खाली कोसळले, त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय उजव्या हाताला आणि पायालाही इजा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रा तेलंगणात दाखल झाली. नितीन राऊत हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. सामान्य जनता, कार्यकर्ते राहुल गांधीं यांच्या भेटीसाठी धडपड करीत होते. या गर्दीतून मार्ग काढत राहुल यांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला आणि ते खाली पडले, यात त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून डोक्याला आणि हातालाही मार लागला आहे.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !