Navgan News

ताज्या बातम्या

लिंबागणेश जि.प.केंद्र प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन “साजरा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


लिंबागणेश जि.प.केंद्र प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन “साजरा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त लिंबागणेश जि.प.केंद्र प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन “साजरा करण्यात आला. डाॅ.कलाम यांचे लेखन प्रेरणादायी असून “चांगले पुस्तक हे शंभर मित्रां सारखे असते म्हणत शालेय मुलांनी पुस्तके वाचावीत ईतर साहित्य सुद्धा वाचावे तसेच युवापिढीने भारत महासत्ता बनण्यासाठी युवापिढीला वाचन करण्याची प्रेरणा दिली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक एस.बी. आगम,प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे,सहशिक्षक बी.बी.चौरे,आर.डी. चव्हाण,श्रीमती एम.बी. कुलकर्णी,श्रीमती एस.एन.कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर पुरी सर यांनी केले.
अमर पुरी यांनी विद्यार्थ्यांना डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विद्यार्थ्याबद्दल केलेल्या कार्याची ओळख करून दिली तसेच महापुरूषांच्या सचित्र पुस्तकांचे वाचन करण्यात आले.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *