ताज्या बातम्या

गंगाई फार्मसी काॕलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा


गंगाई फार्मसी काॕलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

आष्टी : आनंद चॅरिटेबल संस्था संचलित गंगाई फार्मसी कॉलेज कडा ता आष्टी जी.बीड येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती, मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या व्यवस्थापन परीषद समिती चे सदस्य व आंनदराव धोंडे महाविद्यालय कडा चे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते सर लाभले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.श्री भीमरावजी धोंडे साहेब , डाॕ अजय दादा धोंडे व श्री अजय दादा धोंडे तसेच संस्थेचे प्रशासन अधिकारी डाॕ.डी.बी.राऊत, श्री शिवदास विधाते, श्री दत्तात्रय गिलचे, श्री माऊली बोडखे, श्री शिवाजी वनवे व श्री संजय शेंडे यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस अभिवादन केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करून डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे व पुस्तकाचे पूजन अध्यक्ष डॉ.हरिदास विधाते सर व कॉलेजचे प्राचार्य श्री. अशोक बी. गदादे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. विधाते यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले विद्यार्थ्यांनी कोणकोणते पुस्तके वाचले पाहिजेत याबद्दल माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे पुस्तक वाचावे व ज्या पुस्तकांमध्ये आवड असेल ते पुस्तक वाचले पाहिजेत असे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांचे विद्यार्थी व यूथ यांच्याबरोबर चे असलेले संबंध विद्यार्थ्यांना सांगितले तसेच त्यांच्यामध्ये असलेले क्रिएटिव्हिटी व कल्पकता याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले तसेच त्यांचा स्वतःचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी संपर्क झाला याचाही त्यांनी आठवण करून दिली व या दिवसाचे महत्त्व विशद करताना डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाची माहिती डॉ. विधाते यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच कॉलेजचे प्राचार्य अशोक गदादे यांनी वा वाचन हे अखंडित राहिले पाहिजेत त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वाचन करण्याचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी रोज पुस्तक वाचावे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी Think & Grow Rich, Mega living, Power of Subconscious Mind, या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला हे पुस्तके विद्यार्थ्याने वाचले पाहिजेत. वाचनालयातील पुस्तकांबद्दल माहिती देण्यात आली.
या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी पुस्तकांचे ग्रुप वाचन केले त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी समोर येऊन पुस्तकाचे वाचन केले यावेळी कॉलेजच्या लायब्ररी सर्व प्रकारचे पुस्तके उपलब्ध केले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल देवकर मॅडम व अनिकेत डाके सर यांनी केले त्यानंतर HOD रागिनी सोळंके मॅडम यांनी प्रस्तावना केली व ईंटरनॕशल पेपर केलेला जगताप प्रतिक या विद्यार्थ्यांचा व प्रोजेक्ट स्पर्धेच्या विजेता चव्हाण स्नेहल, पवार अनुराधा व अमृत पल्लवी या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॕ.विधाते यांच्या हस्ते करण्यात आला याचे नियोजन मंगल लाटे व साईनाथ पांढरे यांनी केले. पुस्तक वाचन कार्यक्रम याचे नियोजन राहुल दानवे यांच्या सोबात सर्व स्टाफ यांनी केले
पुस्तकांचा हा खजिना पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र होते. यामुळेच कॉलेज मधील शंभर टक्के विद्यार्थी आता वाचनालयाचा विषयांच्या पुस्तका वेतिरिक्त इतर पुस्तकांचा आनंद घेतील, अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली. दररोज कमीत कमी अर्धा तास पुस्तकांचे वाचन करणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच भाऊसाहेब कणासे, विकास अनारसे, श्री राऊत, पल्लवी बोडखे, सुजीत अनारसे , गणेश गांजुरे, किशोर शेळके व सौ संगिता राऊत यांनीही आपले योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी राहुल दानवे .यांनी उपस्थिती सर्वांना ‘वाचन प्रेरणा दिना’च्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *