चनई येथील बौद्ध समाजातील ग्रामपंचायत सदस्याच्या हत्याकांडाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आरोपीस तात्काळ अटक करा नसता तीव्र आंदोलन करू – किसन तांगडे
चनई येथील बौद्ध समाजातील ग्रामपंचायत सदस्याच्या हत्याकांडाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला
आरोपीस तात्काळ अटक करा नसता तीव्र आंदोलन करू – किसन तांगडे
आष्टी / बीड : (गोरख मोरे ) : चनई , तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील बौद्ध ग्रामपंचायत सदस्याच्या हत्याकांडातील आरोपीच्या अटकेसाठी मयताच्या मुलाला सोबत घेऊन किशन तांगडे सह कार्यकर्त्यांनी एस पी नंदकुमार ठाकूर साहेब बीड यांची घेतली भेट .
सविस्तर माहिती अशी की , बौद्ध समाजातील भीम आर्मी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ सिताराम घनघाव यांची गावातीलच राशन दुकानदारा सोबत राशन वाटपावरून दसऱ्याच्या दिवशी सकाळी हमरी तुमरी झाली होती , आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान सतरा ते अठरा जनाच्या टोळक्याने गोरखनाथ घनघाव यांचा तीक्ष्ण हत्याराने भर दिवसा खून केला , अर्थात याच्या पाठीमागे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीची झालर होतीच .
एकूण सतरा ते अठरा आरोपी पैकी काही आरोपींना अटक झाली असून या नियोजित कटातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी , याकरिता किशन तांगडे यांनी बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांची मयताचा मुलगा रामधन गोरखनाथ घनघाव याला सोबत घेऊन भेट घेतली . या दरम्यान एस पी साहेबांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे ठोस आश्वासन दिले .
याप्रसंगी किशन तांगडे सह गावचे सरपंच अनिल शिंदे , मयताचा मुलगा आणि फिर्यादी रामधन घनघाव , युवा नेते सतीश शिंगारे , प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ वाघमारे , युवा नेते विशाल वक्ते , ऍडव्होकेट सुभाष शिंदे , प्राध्यापक फुलचंद लुचारे , मधुकर मोरे , दगडू घनघाव , विजय आदमाने सह आदी कार्यकर्ते या भेटी प्रसंगी उपस्थित होते .