पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय समाज भूषण अवार्ड २०२२रहेमान सय्यद यांना जाहीर
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय समाज भूषण अवार्ड २०२२रहेमान सय्यद यांना जाहीर
कडा : बहुजन ग्रामविकास सेवा संघ महाराष्ट्र राज्य मार्फत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय अवार्ड यथोचित गौरव करून जिल्ह्यासह राज्य स्तरावर ओळख व्हावी व सर्व समाजापर्यंत त्यांचे कार्य पोहोचावे या हेतूने हा पुरस्कार दिला जातो. दर वर्षीचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. त्याच अनुषंगाने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आष्टी तालुक्यातील कडा येथिल सय्यद रहेमान सय्यदअली यांच्या कार्याची दखल घेत यंदाचा राज्यस्तरीय समाजभूषण अवार्ड २०२२ पत्रकारिता व सामाजिक कार्याकरिताचा पुरस्कार पत्रकार रहेमान सय्यद यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार निवडीचे पत्र बहुजन ग्रामविकास सेवा संघाचे सचिव रामनाथ बोऱ्हाडे यांनी दिले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.१३ आँक्टोबर २०२२ गुरुवार रोजी श्रीगोंदा- काष्टी जि.अहमदनगर याठिकाणी दुपारी ठिक १ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय समाजभूषण अवार्ड २०२२ हे पुरस्कार रहेमान सय्यद यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सदैव आणि सातत्याने सामाजिक आणि पत्रकारीता क्षेत्रांमध्ये स्वतःला वाहून घेत समाजाचा भारवाहक म्हणून कार्य करणारे युवक हे गेले एक दशका पेक्षा अधिक,अगदी युवा अवस्थेमध्ये सामाजिक भान राखून धडपडणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा अर्थातच रहेमान सय्यद यांची आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रहेमान सय्यद यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.