ज्योती अशोक माळवे रा.काळवाडी ता. मोहोळ हिचे निंबोणी येथील अशोक यशवंत माळवे यांच्याबरोबर लग्न झाले होते पहिली पत्नी असताना त्याने उषा दत्ता भोसले रा. कचरेवाडी तिच्याबरोबर 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दत्ता भोसले यांचे घरी लग्न केले होते.
मंगळवेढा : पहिली पत्नी असताना दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणात पतीसह नऊ जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणाची फिर्याद अंगणवाडी सेविका नंदा शंकर उन्हाळे वय 43 रा दत्तू वस्ती डोंगरगाव यांनी दिली.
याबाबत माहितीनुसार पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती अशोक माळवे रा.काळवाडी ता. मोहोळ हिचे निंबोणी येथील अशोक यशवंत माळवे यांच्याबरोबर लग्न झाले होते पहिली पत्नी असताना त्याने उषा दत्ता भोसले रा. कचरेवाडी तिच्याबरोबर 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दत्ता भोसले यांचे घरी लग्न केले होते.
या लग्नाचे फोटो 16 सप्टेंबर रोजी मोबाईलवर ठेवल्याचे पहिल्या पत्नीने पोलिसात दाखवले त्यानंतर या घटनेची वस्तुस्थिती पाहण्यासाठी पोलीस पाटील पांडुरंग खडतरे, सरपंच संगीता काळुंगे,कचरेवाडी तलाठी दीपा पवार यांना डोंगरगाव येथे पाठवले त्यांनी येथे मुलीच्या घरी विचारणा केली असता सदरचे लग्न झाल्याचे सांगितले सदर मुलीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा खवे येथे झाले असून या शाळेतील शाळा सोडल्याचा दाखला ताब्यात घेऊन त्यावर वय पाहिले असता सदर मुलीचे वय सोळा वर्षे तीन महिने असल्याचे दिसून आले व त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचा पती अशोक यशवंत माळवे रा.निंबोणी याला विचारले असता त्याने उषा दत्ता भोसले राहणार डोंगरगाव हिच्या बरोबर लग्न झाल्याची कबुली दिली या लग्नासाठी गोमाबाई शंकर शिंदे राधा यशवंत शिंदे कृष्णा यशवंत माळवे हे सर्वजण रा.निंबोणी ता. मंगळवेढा, दत्ता धोंडीराम भोसले शारदा दत्ता भोसले रा. कचरेवाडी व इतर अनोळखी दोन ते तीन इसम असल्याचे सांगितले यावरून या सर्वा विरोधात मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील लग्न लावून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पती व त्याच्या भावास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे