मुकेश अंबानी शुक्रवारी पहाटेच मंदिरात पोहोचले दीड कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराला भेट दिली. यावेळी मुकेश अंबानी यांनी एन्कोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आणि रिलायन्सच्या इतर अधिकाऱ्यांसोबत भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले.
मुकेश अंबानी यांना भगवान व्यंकटेश्वराबद्दल खूप आदर आहे. भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनांनंतर मुकेश अंबानी यांनी मंदिराला दीड कोटी रुपये दान केले.
मुकेश अंबानी शुक्रवारी पहाटेच मंदिरात पोहोचले होते. मंदिरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रार्थना केल्यानंतर अंबानी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए.के. वेंकट धर्मा रेड्डी यांच्याकडे दीड कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यानंतर अंबानी आणि सहकाऱ्यांनी तिरुमला टेकडीवर असलेल्या एका गेस्टहाऊसमध्येही काही काळ घालवला.
गेस्ट हाऊसमध्ये काही वेळ घालवल्यानंतर या सर्वांनी पूजेतही सहभाग घेतला. मुकेश अंबानी, राधिका मर्चंट आणि इतरांनी सूर्योदयाच्या वेळी गर्भगृहात पुजाऱ्यांनी केलेल्या वैदिक मंत्रोच्चारात केलेल्या अभिषेकमध्ये देखील सहभाग घेतला. हा अभिषेक सुमारे एक तास चालला. अभिषेक झाल्यानंतर अंबानींनी मंदिरातील हत्तींनाही अन्नदान केले.