अमरावती : अमरावतीच्या (Amravati Crime News) पंचवटी (Panchvati) परिसरात अनोळखी बॅग आढळून आली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संशयास्पद बँगेची (Suspicious Bag) गंभीर दखल आता पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने घेतली आहे. हा घातपाचा कट आहे की आणखी काही, या अनुषंगाने अधिक तपास केला जातोय. संशयास्पद बॅगेबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिसांसोबत श्वान पथक, बॉम्बशोधत पथकही पंटवटी या ठिकाणी दाखल झालं आहे. सध्या या ठिकाणी कसून तपास केला जातो. संशयास्पद बँग आढळल्यानंतर आता अमरावतीमध्ये पोलीस यंत्रण सतर्क झाली आहे.
बेवारस बॅग आढळून आल्यामुळे अमरावतीत पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. जागोजागी पोलीस यंत्रणा आता अधिक अलर्ट झाली आहे. गणेशोत्सवात पोलिसांकडून संपूर्ण राज्यभरातच चोख यंत्रणा उभी करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसली होती. आता गणपती विसर्जनानंतर 48 तासांतच अमरावतीत संशयास्पद बॅग आढळल्यानं सतर्कता बाळगली जातेय.
नेमकं या बॅगेमध्ये काय आहे? ही बॅग कुणी ठेवली? हा घातपाताचा कट तर नाही ना? पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आलाय का? असा अनेक प्रश्नांचं गूढ आता वाढलंय. या सर्व प्रश्नांच्या अनुशंगाने पोलीस तपास करत आहेत.
सध्या बॉम्बशोधक पथक पंचवटीत दाखल झालंय. या पथकाकडून अधिक शोध घेतला जातोय. त्यातून अनेक गोष्टींचा खुलासा होईल. दरम्यान, श्वान पथकाच्या मदतीनेही चौकशी केली जाते आहे. ही बॅग नेमकी कुणाची, यासाठीही पोलिसांकडून तपास केला जातो आहे. संपूर्ण प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचं अमरावतीत पाहायला मिळतंय.