मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तीभावाने पूजा केली. यावेळी बीडच्या नवले दांमप्ताला पहिला वारकऱ्याचा मान
मुख्यमंत्र्यांसोबतच दर्शन रांगेतील पहिल्या वारकऱ्यासही विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळत असतो. यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसोबत केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. शिवाय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी याच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आषाढी एकादशीचा सोहळ्यास आज पंढरपुरात उत्साहात सुरुवात झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तीभावाने पूजा केली. यावेळी बीडच्या नवले दांमप्ताला पहिला वारकऱ्याचा मान मिळाला. नवले दांमत्य गेल्या १२ वर्षांपासून वारी करत आहे.
महापूजेनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी मी विठ्ठलाकडं प्रार्थना केली. वारकऱ्यासांठी विकास आराखडा तयार करणार असून स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळं वारकऱ्यांना सर्व मदत केली जाईल. माझ्यासाठी आजचा दिवस आनंदा आहे. 12 कोटी जनतेच्या वतीनं आज मी विठू माऊलीची पूजा केली. शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी पांडुरंगाला मी साकडं घातले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठूनामाचा जयघोष करत पंढरीत दाखल झाले. गेली दोन वर्ष कोरोनामुळं कार्यक्रम होऊ शकला नाही. यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह चांगलाच होता. कोरोनाचं संकट गेलं पाहिजे. ते जातंय, परत वाढतंय; पण आता त्याची जाण्याची वेळ आली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.