ताज्या बातम्याधार्मिकमुंबई

मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध आक्रमक भूमिका,सरकारला तीन तारखेचा अल्टीमेटम


मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध आक्रमक भूमिका,सरकारला तीन तारखेचा अल्टीमेट ,मगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरविण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलंय

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी या प्रकरणात थेट सरकारला तीन तारखेचा अल्टीमेटम दिला आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरविण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा देखील उल्लेख केला होता.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस सज्ज आहेत, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आता मनसेने थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आता नाशिकच्या मनसे नेत्यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे. नाशिक मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ठाकरे सरकारला निद्रेश देण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सहकार्य करावं, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.

भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देणे हा इस्लामचा भाग नसून अनेक मुस्लिम देशांमध्ये यावर कडक निर्बंध असल्याचं देखील पत्रात म्हटलंय. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *