ताज्या बातम्या

बीड प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे पद्मश्री शब्बीर मामू यांना एकही योजना मिळाली नाही


बीड – 2019 मध्ये बीडच्या (Beed) शब्बीर मामु यांना केंद्र सरकार कडून पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाची त्रिसूत्री योजना, शब्बीर मामुला देण्याचं सांगितलं.

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. शब्बीर मामू व त्यांचे कुटुंबीय आजघडीला जवळपास १२५ गाई व कालवडी सांभाळत आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणाचीही मदत न घेता गाईंचा सांभाळ केला आहे. मात्र सध्या उन्हामुळे या भागात पाण्याची टंचाई भासत आहे. दावणीला असणारी जनावरे डोंगरावर नेऊन चार किलोमीटर पायपीट करून सर्व जनावरांना पाणी पाजावे लागत आहे. जनावरांची पाण्याची सोय जागेवर व्हावी, यासाठी कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना व गाईंसाठी पिण्याच्या पाण्यासाठी हौद द्यावा, अशी मागणी केलेली आहे. त्यांनी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची भेट घेऊन या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

तीन मागण्यांचे दिले स्मरणपत्र
पद्मश्री पुरस्कारप्राप्त शब्बीर मामू यांनी भारत सरकारचे ओळखपत्र द्यावे, गाईंना पिण्यासाठी पाण्याचा हौद मिळावा व कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना मिळावी, यासाठी १२ जून २०१९ रोजी अर्ज केला होता. परंतु, अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने त्यांनी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे स्मरण करून देणारे पत्र नुकतेच दिले आहे.

प्रत्येक व्यक्तीला त्याचे ओळखपत्र असते. त्याचप्रमाणे भारत सरकारने ओळखपत्र द्यावे. गाईंच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना व पाण्याच्या हौद द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यावर सकारात्मकपणे निर्णय घेण्यात येईल, असे अपेक्षित आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *