बीड : (प्रतिनिधी) आजची तरुणाई हि व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे. देशाचा आधार स्तंभ म्हणून ज्या युवक वर्गाकडे आपण पाहतो तोच युवक आज दिशाहीन व विचारहिन झाला आहे. जर व्यसनाचे प्रमाण असेच वाढत राहीले तर या देशाचे भवितव्य धोक्यात आहे असे ऊद्गार सामाजिक कार्यकर्ते व सिंदफणा अर्बन मल्टिपल निधी लिमिटेडचे शिरूर कासार जिल्हा बीड. चे संस्थापक आजिनाथ गवळी यांनी केले. बीडच्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रास दिलेल्या भेटीत ते बोलत होते डॉ. राजकुमार गवळे,प्रा. अंजलीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिज्योत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहे. मागील सात वर्षांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून सुमारे दहा हजार पेक्षा अधिक तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून चांगल्या मार्गाला आणले व काही युवकांचे पुनर्वसन त्यांनी केले ,अशा व्यसनमुक्ती केंद्राची निर्मिती होणे ही आता काळाची गरज आहे. या देशाची तरुणाई टिकली तर देश टिकेल .दिलेल्या भेटीमध्ये नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने त्यांचा हृदय पूर्ण सत्कार करण्यात आला यावेळी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक आजिनाथ शेरकर, जनसंपर्क अधिकारी ओम डोलारे, समुपदेशक व महिला तक्रार निवारण व कौटुंबिक सल्लागार वर्षाताई शेरकर, अमोल जोमदे ,गोविंद पवार आदी कर्मचारी उपस्थित होते शेवटी सामूहिक प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक अमोल मस्के यांनी केले तर आभार अमित रणवरे यांनी केले.