चीनच्या शांघायमध्ये कोरोनाचे १ हजार नवे रुग्ण आढळून आल्यानंतर सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळांना पुन्हा ऑनलाइन वर्ग घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
संसर्गाला रोखण्यात अपयश आल्याने शाळांना इशारा देण्यात आला आहे. चीनमध्ये एक अन्य शहर वुहानमध्येदेखील रुग्णसंख्या वाढली. चीनच्या उत्तर-पूर्व भागात रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवरील ९० लाख लोकसंख्येच्या चांगचुंग शहरात शुक्रवारी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येथील सर्व नागरिकांची कोरोनाची तीन वेळा तपासणी केली जात आहे.