हातातोंडाशी आलेला घास पाकोळीने हिरावला;भावच नाही त्यातही ८० टक्के टोमॅटो फेकुन द्यायची पाळी, शेतक-याची व्यथा
हातातोंडाशी आलेला घास पाकोळीने हिरावला;भावच नाही त्यातही ८० टक्के टोमॅटो फेकुन द्यायची पाळी;खंडाळा येथील अशोक बांगर शेतक-याची व्यथा
___
बीड तालुक्यातील मौजे खंडाळा येथील शेतकरी दांमपत्यानं ३५ गुंठे प्लाॅटमध्ये विराट जातीच्या टोमॅटोची लागवड केली, साधारणतः दीड लाख रूपये खर्च आला, पीक जोमानं आलं ५ लाखाच्या आसपास उत्पन्न निघेल याची खात्री असतानाच पाकुळी आजाराच्या प्रादुर्भावाने टोमॅटो किडण्यास सुरूवात झाली, त्यामुळेच ८० टक्के टोमॅटो बांधावर टाकुन द्यायची वेळ आली, मजुर लाऊन काढायला सुद्धा परवडेना झालंय पण रान मोकळं करायचं म्हणून काढणी करतोय पर्याय नाही. महाराष्ट्र ग्रामिण बॅकेचं २ लाख रूपये कर्ज यासाठी घेतलं होतं आता त्याचे हफ्ते फेडणं सुद्धा जड झालंय.
मजुर लाऊन काढणं सुद्धा परवडंना झालंय:-सत्यभामा बांगर
____
आम्हा घरच्यांचं कष्ट तर मातीमोल झालंय, परंतु काढण्यासाठी १०-१२ बाया लावाव्या लागतात, २०० रूपये मजुरी द्यायची आणि सध्या भाव मिळतोय २०० ते २५० रूपये कॅरेट, एरवी ७५०-८०० रूपये कॅरेट पर्यंत भाव मिळायचा यंदा भाव आधीच कमी आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणून पाकुळीने ८० टक्के टोमॅटो फेकुन द्यावा लागतोय.