बीड : केज ,महिलेला घरातून बाहेर फरफटत ओढत घेऊन दगडाने ठेचून खून (Brutal murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड (beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यातील हंगेवाडी येथील पारधी वस्तीवर (pardhi) ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखुबाई बन्सी शिंदे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. केज तालुक्यातील नांदुरघाट ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे पारधी वस्ती असून त्याठिकाणी पंधरा ते वीस पारधी कुटुंबे राहतात.
शुक्रवारी मध्यरात्री सखुबाई बन्सी शिंदे हिचा घरातून बाहेर फरफटत ओढत घेऊन दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खून केल्यानंतर मृतदेह तसाच रस्त्याच्या कडेला घराच्या समोर टाकून आरोपीने पलायन केले. यावेळी आसपास व परिसरातील सर्वांना चौकशी केली असता संशयित आरोपी राजा बन्सी शिंदे (वय 35) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (बेडरूमपेक्षा मोठा मलायकाचा वार्डरॉब, चपलांचे कलेक्शन पाहून डोळे फिरतील) सखुबाई ही घरी एकटीच राहत होती.
दोन्ही मुले कारखाना ऊसतोडीसाठी जात असून मुले सुना कारखान्याला आहेत. सखुबाई दोन जनावरे घेऊन गायरानात राहत होत्या. आरोपी राजा शिंदे उर्फ टूल्या याने गावात सतत भांडणे करून दहशत पसरवत होता, असं नातेवाईकांनी सांगितलं. रात्री सखुबाई झोपलेल्या असताना आरोपी राजा शिंदे घरात शिरला आणि सखुबाई यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचे डोके पूर्ण दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी पंकज कुमावत यांनी घटना स्थळाची पाहणी केली. तसंच खून करण्यासाठी वापरण्यात आलेले दगड रक्ताने भरलेले दगड आणि फरफटत बाहेर आणलेले रक्ताने भरलेली दोर पोलिसांनी जप्त केली आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालय नांदुर घाट इथं पाठवण्यात आला आहे. केज ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.