Navgan News

ताज्या बातम्या

पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार


पिंपरी : पार्टी देण्यास नकार दिल्याने दुरच्या नातेवाईकाने एकावर कोयत्याने वार करत जखमी केले.बुधवारी (दि. १९ ) रात्री साडेआठच्या सुमारास देहूगावातील चव्हाणनगर येथे ही घटना घडली. निखिल नंदनराज चव्हाण (वय ३२, रा.देहूगाव ) यांनी या प्रकरणी गुरुवारी (२० जानेवारी) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश चंद्रकांत पाटोळे (वय २८, रा.देहूगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपले नातेवाईक सर्जेराव ओव्हाळ उर्फ दावडीकर घरासमोरील मोकळ्या मैदानाता मित्रांसोबत नाचत होते. त्या वेळी त्यांच्या भावकीतील दुसचा नातेवाईक असणारा आरोपी पाटोळे तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे पार्टी मागितली. मात्र, फिर्यादी यांनी पार्टी देण्यास नकार दिल्याने त्याने लोखंडी कोयत्याने त्यांच्याव वार केला. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या डोक्याला इजा झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *