बीड बाणाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा केला सन्मान
बीड : बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने बीड शहरातील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास दि.09 जानेवारी रोजी अभिवादन करून व समाजकारणात उल्लेखनीय कार्य करणार्या पाच महिलांचा सत्कार करण्यात आला.
बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षीताई देवकते-डोमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीड शहर पोलिस ठाण्याचे पीएसआय भुतेकर, पत्रकार अॅड. संदीप बेदरे, पत्रकार श्वेता घाडगे, अॅड.आप्पासाहेब जगताप, धनगर समाज कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष अंकुश निर्मळ, रा.कॉ.महिला मराठवाडा समन्वयक प्रज्ञाताई खोसरे यांची उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या एकल महिला संघटनेच्या रूक्मिनी नागापुरे, गेवराई एस.टी.आगारच्या महिला वाहक अनुसया जाधव, सुषमा येळे, आशा वर्कर स्वाती करडकर, रा.स.पा.च्या महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई सारूक यांचा पीएसआय भुतेकर, मिनाक्षीताई देवकते-डोमाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आप्पासाहेब महानोर, वडवणीचे माजी सभापती गणेश शिंदे, रा.कॉ. ओबीसी विभाग सोशल मिडीया प्रतिनिधी जयश्री घोडके, म.पो.कॉ. हजार, पो.ना.भारती, डी.एस.बी. सानप यांची उपस्थिती होती. यावेळी मिनाक्षीताई देवकते- डोमाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजन व पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सदरील कार्यक्रम शासनाच्या कोरोना विषयीच्या नियमांचे पालन करून संपन्न झाला.