Navgan News

ताज्या बातम्या

बीड आरोग्य गट ‘क’ पेपरफुटीच्या प्रकरणी येथील जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक


बीड : आरोग्य गट ‘क’ पेपरफुटीच्या प्रकरणी येथील जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली. उद्धव प्रल्हाद नागरगोजे, असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातून आतापर्यंत उद्धव नागरगोजेसह, प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे अशा ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे आला अटक करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. गेल्या १५ दिवसांपासून पुणे येथील पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होते. विविध अधिकारी आणि परीक्षा घेणार्‍या आयटी आस्थापनांतील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात या आरोपींचा सहभाग होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *