Navgan News

ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आक्रित घडलं. प्रचार रॅलीत मोठा स्फोट; काय घडल ?


राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत होते. राज्यातील सर्वच बडे नेते सभांमध्ये व्यस्त होते.

अशातच आज कल्याणमध्ये निवडणूक प्रचाराच्या सांगतेदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याणमधील योगिधाम परिसरात पॅनल क्रमांक 2 मधील महायुती उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कल्याणमध्ये धक्कादायक घटना

कल्याणमधील योगिधाम परिसरात महायुती उमेदवारांच्या प्रचार रॅली सुरू होती यावेळी रॅलीतील झेंडा टाटा कंपनीच्या विजेच्या वायरला लागल्याने जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत क्षितिज पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महायुतीचे उमेदवार दया गायकवाड, वनिता पाटील ,गणेश कोट ,अनघा देवळेकर यांच्या प्रचार रॅली दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे आता योगिधाम परिसरातील विजेच्या लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *