हल्ला करणार?, या हात तोडून टाकतो. अमेरिकेला या देशाचे ओपन चॅलेंज, जगावर भयंकर संकट…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सततच्या धमक्यांमुळे जग अस्थिर झाल्याचे बघायला मिळतंय. फक्त आणि फक्त वेनेजुएलाच्या तेलाकरिता त्यांनी काही दिवस युद्ध लढले आणि मोठे हल्ले केले.
वेनेजुएलातून अमेरिकेत अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे कारण देत त्यांनी थेट वेनेजुएलाचे अध्यक्ष मोदुरा यांना अटक केली आणि अमेरिकेत आणले. प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वेनेजुएलाच्या तेलावर ताबा हवा होता. मागील काही दिवसांपासून ते सतत वेनेजुएलावर अमेरिकेकडून हल्ले केली जात होती. शेवटी त्यांनी आता थेट वेनेजुएलावर ताबा मिळवला. अमेरिकेने शेजारच्या देशावर कशा चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवला हे अख्ख्या जगाने बघितले आणि त्याचा निषेध देखील केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच स्पष्ट केले की, आता वेनेजुएलाच्या तेलावर माझे नित्रंयण असणार आहे. मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असल्याने.
एका रात्रीत वेनेजुएलावर हल्ला करून अमेरिकेने त्यांच्या तेलावर पूर्णपणे ताबा मिळवला. आता वेनेजुएलानंतर अजून काही देशांवर अमेरिकेची नजर आहे. इराणमध्ये सध्या जी स्थिती आहे त्याच फायदा घेण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. इराणचे आर्मी चीफ मेजर जनरल अमीर हातमी यांनी 7 जानेवारी 2026 रोजी मोठी चेतावणी अमेरिकेला दिली. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात म्हटले की, कोणत्याही देश हा इराणला धमकी देऊ शकत नाही. जर आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर त्याचे हात कापले जातील.
अमेरिकेच्या धमकीनंतर इराण देखील थेट मैदानात उतरला असून आम्हीही तयार आहोत, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी एका मुलाखतीमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना थेट धमकी दिली इराणने आंदोलकांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी,असे म्हटले आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानाला गंभीरपणे घेतले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर इराणनेही थेट धमकी दिली.
वेनेजुएलावरील अतिक्रमणानंतर अमेरिकेच्या टार्गेटवर इराण असल्याचे बोलले जात आहे. इराणमध्ये सध्या स्थिती तणावाची आहे. त्याचाच फायदा अमेरिकेकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन केले जात असून हे आंदोलन थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. या आंदोलकांवर थेट गोळीबार करण्यात आल्याने मोठी खळबळ देखील उडाली होती.






