सकाळी उठल्यानंत केलेली ‘ही’ चूक शरीरासाठी ठरेल जीवघेणी, कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन होईल मृत्यू…

हार्ट अटॅक येण्याची कारणे? सकाळी केलेल्या कोणत्या चुकांमुळे हृदयाचे आरोग्य बिघडते?
हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
हृदयाचे आजार जीवनशैलीतील चुकांमुळे उद्भवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवावर बेतू शकतो. मागील वर्षभरात अनेकांना हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. रोजच्या आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, कामाचा तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक सकाळी उठल्यानंतर असंख्य चुका करतात. या चुकांच्या परिणामांमुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा दैनंदिन जीवनातील अतिशय साध्या वाटणाऱ्या सवयी हार्ट अटॅक येणाचे कारण ठरतात. त्यामुळे नेहमीच शारीरिक हालचाली, पौष्टिक आहार आणि भरपूर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. जाणून घ्या हार्ट अटॅक येण्याची कारणे.
झोपेतून उठल्यानंतरची हालचाल न करणे:
झोपेतून उठल्यानंतर सगळ्यांचं आधी मोबाईल बघण्यास लागतो. त्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. मोबाईल पाहत घरातील इतर कामे केली जातात. मात्र ही सवय शरीरासाठी धोक्याची ठरते. झोपेमध्ये शरीर पूर्णपणे शांत होऊन जाते, ज्यामुळे झोपेतून उठल्यानंतर शरीराला हालचालींची आवश्यक असते. झोपेतून उठल्यानंतर लगेच उठून न बसता शारीरिक हालचाल करत अंथरुणावर ५ ते १० मिनिटं शांत पडून राहावे. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. हालचाल न करता जास्त वेळ अंथरुणावर पडून राहिल्यास शरीराला सुस्ती येते. ज्यामुळे रक्ताभिसरणाची गती मंदावते आणि हृदयावर अनावश्यक तणाव येतो, ज्याचा परिणाम हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर होण्याची शक्यता असते.
इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका:
सकाळी उठल्यानंतर शारीरिक हालचाली न केल्यास इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो आणि शरीराच्या चक्रात बदल होतात. शारीरिक हालचाल न केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि पोटावर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागतो. शरीराचे वाढलेले वजन हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे हळूहळू रक्तदाब वाढणे, शरीरात जळजळ होणे, पोटावर चरबीचा घेर आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढून आरोग्याला हानी पोहचते.
शारीरिक हालचाल:
सकाळी झोपेतून उठल्यानंतर ५ मिनिटं हलक्या शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. यामुळे गंभीर आजारांपासून तुमचा जीव वाचेल. वेगाने चालणे, हलके स्ट्रेचिंग किंवा दीर्घ श्वसनाचे व्यायाम इत्यादी अनेक गोष्टी केल्यामुळे शरीराचे कार्य पुन्हा एकदा सुरळीत होते. शारीरिक हालचाली केल्यामुळे रक्तभिसरण सुधारते, वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि मेटाबॉलिझम सक्रिय होऊन हृदयाच्या स्नायूंना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होतो. हृदयाचे रक्षण करण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






