कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला, भगवान गणेशाला अर्पण करा ‘हे’ नैवेद्य, तुम्हाला सर्व समस्यांपासून मिळेल मुक्ती…

गणेश संकष्टी चतुर्थीचा उपवास हा भगवान गणेशाला समर्पित आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी योग्य विधींसह उपवास आणि पूजा करून, भगवान गणेश भक्तांच्या जीवनातील सर्व त्रास आणि अडथळे दूर करतात.
वैदिक कॅलेंडरनुसार, गणपती संकष्टी चतुर्थी ८ नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. या शुभ दिनी भगवान गणेशाला प्रिय नैवेद्य अर्पण केल्यास सर्व समस्या दूर होतील अशी मान्यता आहे.
पुढीर पदार्थ करावे अर्पण
मोदक/लाडू
भगवान गणेशाला मोदक खूप आवडतात. मोदक अर्पण केल्याने भगवान प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना बुद्धी आणि समृद्धी मिळते.
दुर्वा
भगवान गणेशाला गुळासह २१ दुर्वा अर्पण करणे विशेष फलदायी असते. यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते.
केळी
गणेशाला फळांची खूप आवड आहे. गणपतीला केळी अर्पण केल्याने सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळते. तसेच अडलेले काम पूर्ण होते.
नारळ
नारळ अर्पण केल्याने त्रास किंवा समस्या दूर होतात असे मानले जाते.
महत्त्व
गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि संकटांपासून मुक्तता मिळते. या दिवशी चंद्राचे दर्शन आणि सूर्याची प्रार्थना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतात. भगवान गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता मानलं जातं. असं म्हटलं जातं की त्यांची पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते.
पुढील गोष्टी करणे टाळा
मद्यपान करणे टाळावे.
मांसाहार करू नका.
मोठ्यांना अपशब्द बोलू नका.
संध्याकाळी घर झाडू नका.
या दिवशी घरात नखे कापू नये.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. नवगण न्युज अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.






