पाकिस्तान भिकेला लागला,टोमॅटोचा भाव 700 रुपये किलोंपेक्षा जास्त महागाईमुळे जगणं कठीण!

पाकिस्तान हा नेहमीच महागाईने त्रस्त असतो. तिथे कधी अन्नधान्य महाग होते तर कधी तेथे फळभाज्यांचे दर गगनाला भिडतात. याच कारणामुळे तिथे सामान्यांना जगणे कठीण होऊन बसले आहे.
सध्या पाकिस्तानातील जनता टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे त्रस्त आहे. पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत झालेला संघर्ष तसेच इतर स्थानिक कारणांमुळे तिथे टोमॅटोचा भाव तब्बल 700 रुपये (पाकिस्तानी रुपया) प्रतिकिलोवर जाऊन पोहोचला आहे.
टोमॅटोचा भाव 700 रुपये किलोंपेक्षा जास्त
अफगाणिस्तानसोबत संघर्ष झाल्यानंतर पाकिस्तानातील देशांतर्गत बाजाराची फारच वाईट स्थिती झाली आहे. तिथे टोमॅटोचा भाव चांगलाच वाढला आहे. लाहोर, कराची यासारख्या मोठ्या शहरांत हा भाव थेट 500 रुपयापेक्षाही जास्त झाला आहे. स्वयंपाकघरात टोमॅटोला फार महत्त्व आहे. पाकिस्तानात अगोदर टोमॅटोचा भाव 100 रुपये प्रतिकिलो होता. आता हाच भाव थेट 700 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढला आहे.
पुरवठा साखळी विस्कळीत झाली
पाकिस्तानातील या महागाईबाबत तेथील स्थानिक वृत्तवाहिनी समा टीव्हीने सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सध्या पाकिस्तानातील अनेक भागांना अतिवृष्टीने ग्रासलेले आहे. त्यामुळेच या भागातील पीक उद्ध्वस्त झाले आहे. सोबतच अतिवृष्टीमुळे व्यापारदेखील कोडमडला असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे तिते टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरे कारण म्हणजे सीमेवर पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत संबंध खराब झाल्यामुळे आयातीवर परिणाम झाला आहे. परिणामी टोमॅटो तसेच इतर फळभाज्यांचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत.
पंजाब प्रांताला सर्वाधिक फटका
समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये टोमॅटोचा सर्वाधिक भाव पंजाब प्रांतात वाढला आहे. झेलम आणि गुजरांवाला या भागात टोमॅटो अनुक्रमे 700 रुपये आणि 575 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. पाकिस्तानातील अन्य भागांचा विचार करायचा झाल्यास मुल्तानमध्ये टोमॅटोचा भाव 450 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. फैसलाबादमध्ये टोमॅटो 500 रुपये प्रतिकिलोने विकला जातोय. सरकारच्या हिशोबानुसार टोमॅटोचा भाव फार तर 170 रुपये किलो असायला हवा. प्रत्यक्ष मात्र तिथे टोमॅटोचा भाव थेट 500 रुपये प्रतिकिलोच्याही पुढे गेला आहे.