महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात वारंवार अतिवृष्टी का होत आहे?हवामान खात्याने दिली चिंताजनक कारणे …

महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात गेल्या 22 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीने शेतीपीकाचं पार होत्याचं नव्हतं करून टाकलं. एरवी कोरडी ठाक असणाऱ्या सीनासारख्या अनेक नद्यांना तर आजवरचे विक्रमी महापूर आलेत.
समुद्रात वादळं निर्माण होणं आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मुसळधार पाऊस होणं या गोष्टी वारंवार होत आहेत. पण इथं मुळात मुद्दा असा आहे की, हे समुद्रात कमी पट्टे निर्माण होतातच कसे आणि हवामानाचे नेमके कोणते फँक्टर त्यावर प्रभावी ठरतात, याचा सखोल अभ्यास करता प्रशांत महासागरातील तापमान बदलही याला तितकेच कारणीभूत असल्याचं निरिक्षण हवामान तज्न नोंदवतात. तापमानवाढ आणि हवामान बदलाचे परिणाम म्हणून दुष्काळी भागात पूर येत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दुष्काळग्रस्त माणदेशात गेल्या काही वर्षांत सातत्यानं अतिवृष्टी होतेय. तुलनेनं कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. दुष्काळी भागात कमी पावसाची पिकं घेतली जातात. पण धो धो कोसळणा-या पावसामुळं पिकांचं नुकसान ही नेहमीची बाब झालीय. या सगळ्याचा परिणाम तिथल्या माणसांच्या, शेतक-यांच्या जगण्यावर झालाय. .हे दृष्टचक्र थांबवायचं असेल तर शासन पातळीवर नव्याने नदी खोऱ्यांचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्या अनुसार हे पूरस्थितीचे नियोजन झालं पाहिजे…असं मत जलतज्न अनिल पाटील नोंदवतात.
खरंतर ग्लोबल वार्मिग आणि हवामान बदलाच्या क्षेञातले जाणकार सातत्याने याबाबत शासनाला जागं करण्याच प्रयत्न करतात असतात. पण लक्षात घेतो कोण? पूर आला, शासकीय पातळीवर दौ-यांचे पूर आलेत. मग मदतही येईल पण पुढच्यावेळी या पुराचा सामना करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची तसदी कोणीच घेत नाही.
FAQ
1. महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात 22 सप्टेंबर 2025 रोजी काय घडले?
महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात 22 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी या जिल्ह्यांतील अनेक गावे पहिल्यांदाच पाण्याखाली गेली, आणि सीना नदीसारख्या नद्यांना विक्रमी महापूर आला.
2. सीना नदीला आलेल्या महापुराचे वैशिष्ट्य काय आहे?
सीना नदीच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 लाख 15 हजार क्युसेकचा महापूर आला, जेव्हा तिची पाणी वहन क्षमता फक्त 50 हजार क्युसेक आहे. यंदा सीना खोऱ्यात सरासरी 460 मिमी पर्जन्यमानाऐवजी 1,200 मिमी पाऊस कमी कालावधीत पडला, ज्यामुळे माढा, मोहोळ, करमाळा तालुक्यातील नदीकाठची गावे पाण्याखाली गेली.
3. दुष्काळी पट्ट्यात वारंवार अतिवृष्टी का होत आहे?
गेल्या काही वर्षांत मान्सून लहरी झाला आहे, आणि धो-धो पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्रातील वादळे आणि कमी दाबाचे पट्टे वारंवार निर्माण होत असल्याने मुसळधार पाऊस पडतो. यामागे प्रशांत महासागरातील तापमान बदल आणि हवामान बदल यांचा प्रभाव असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.