Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही …

गणेश चतुर्थीचा उत्सव भगवान गणेशाच्या प्रतिष्ठापने सुरू होतो. त्यांच्या मूर्तीच्या विधीवत विसर्जनाने संपतो. परंपरेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला प्रत्येक घरात गणपतीचे स्वागत केले जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना भावनिक निरोप दिला जातो.
विसर्जनाची परंपरा हे दर्शवते की भक्तांनी गणपती बाप्पांना आदराने निरोप दिला आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा पंडालमधून गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी, १० दिवसांसाठी स्थापित केलेल्या गणेशमूर्तींचे नद्या, तलाव इत्यादी जलाशयांमध्ये विसर्जन केले जाते. काही लोक १ दिवस, ३ दिवस, ५ दिवस, ७ दिवसांसाठी देखील गणेशाची स्थापना करतात, ज्यांचे विसर्जन त्यानुसार केले जाते. आज, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होत आहे आणि त्याचा सर्वाधिक उत्सव मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतो. यावेळी अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओ येथे पहा !
या व्हिडिओत नदीत पाण्याच्या प्रवाहात गणपती बाप्पाचा चमत्कार पाहायला मिळाला आहे. गणपती विसर्जनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाविक विसर्जनासाठी नदीवर आले आहेत. यात पुरूष गणरायाचे विसर्जन करत आहे. मात्र मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून न जाता तिथेच थांबत आहे. यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यानंतर भक्ती अशी करावी की गणपतीलाही भाविकासोबत थांबावे वाटेल असे बोलले जात आहे
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत.अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी मुंबईतील रस्त्यांवर ‘ढोल-ताश’चा आवाज, रंगीबेरंगी गुलाल आणि भाविकांची गर्दी यामुळे वातावरण भक्तिमय झाले. मुसळधार पाऊस असूनही, शेकडो लोक मोठ्या भक्तीने गणेश विसर्जन यात्रेत सहभागी होत आहेत आणि लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.
https://x.com/Priya_Rathore99/status/1964178056333185444?t=WBeFN-g7kdDJNMctuwZnVg&s=09