Navgan News

आंतरराष्ट्रीय

कोरोनाबाबत संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बातमी;जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ,देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर …


कोरोनाबाबात संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बातमी सोमर आली आहे. 2020 मध्ये संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरलसमुळे पुन्हा एकदा जगात दहशत पसरली आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 1200 च्या वर पोहचली आहे. तर, सक्रिय रुग्णांची सर्वाधक संख्या महराष्ट्रातील आहे.

 

 

देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर पोहोचली आहे. 12 कोरोना रुग्णांचा म़ृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 325 आहे. त्यापैकी 316 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. यानंतर केरळमध्ये सर्वाधिक 430 कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात 66, कर्नाटकात 36, गुजरातमध्ये 14, बिहारमध्ये 5 आणि हरियाणामध्ये 3 नवीन रुग्ण आढळले.

ईशान्येकडील राज्यातही कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. मंगळवारी अरुणाचल प्रदेशात 2 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यापैकी एका महिलेला ताप आणि सौम्य खोकला आहे, तर दुसऱ्या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत.

 

मंगळवारी उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये 78 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील कोविडच्या नवीन प्रकारामुळे हा पहिलाच मृत्यू आहे. याशिवाय महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.

अमेरिकेत कोविडमुळे दर आठवड्याला 350 मृत्यू

चीनमधून आलेल्या नव्या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे रुग्ण गंभीर नसले तरी अमेरिकेत कोविड-19 ने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत दर आठवड्याला 350 जणांचा मृत्यू कोविड संसर्गामुळे होत आहे. अमेरिकन आरोग्य संस्था सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, गेल्या आठवड्यात 350 नागरिकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये बहुतांश उच्च जोखमीच्या गटातील होते. अमेरिकेत कोरोनाव्हायरसचा नवा सब व्हेरिएंट NB.1.8.1 धुमाकूळ घालत आहे, जो चीनमधून आला आहे.

 

आता न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, व्हर्जिनिया यांसह अनेक मोठ्या अमेरिकन शहरांमध्ये हा वेगाने पसरत आहे. जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्समध्येही हा व्हायरस पोहोचला आहे. यापूर्वी दिलेल्या कोविड लसींची कमी होत जाणारी क्षमता हे यामागील एक कारण मानले जात आहे. जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेत दररोज सुमारे 26 हजार मृत्यू झाले होते. चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड यांसारख्या आशियाई देशांमध्येही हा नवा सब व्हेरिएंट वेगाने पसरत आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *