Navgan News

आरोग्य

काय सांगता? 200 रुपयांची बिअर फक्त 50 रुपयांना मिळणार, नेमका निर्णय काय ?


तुम्हाला बीअर पिण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बिअरची विक्री वाढते. मागणी वाढल्यामुळे अनेकवेळा तुम्हाला तुमचा आवडीचा ब्रँड मिळणे अवगढ होऊ बसते.

आता मात्र निराश होण्याची गरज नाही. कारण उन्हाळ्याच्या या दिवसांत तुम्हाला तुमच्या आवडीची बिअर अगदी कमी पैशांत मिळणार आहे. ब्रिटनचे बिअर ब्रँड्स भारतात कमी पैशांत मिळणार आहेत. भारत आणि ब्रिट यांच्यातील मुक्त व्यापर करारानंतर ब्रिटनच्या बिअरवरील कर भारताने 75 टक्क्यांनी कमी केला आहे.

 

नेमका निर्णय काय घेण्यात आलाय?

याआधी भारतात ब्रिटनच्या ब्रिअरवर 150 टक्क्यांनी कर लागायचा. आता मुक्त व्यापार कराराअंतर्गत हा कर 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल आहे. या कराराअंतर्गत आयात शुल्काबाबत मर्यादित सवलत देण्यात आली आहे. याच निर्णयामुळे भारतात ब्रिटनचा ब्रँड असणाऱ्या बिअर अगदी स्वस्त मिळणार आहेत. त्यामुळे बिअर पिण्याची आवड असणाऱ्यांना कमी पैशांत बिअर मिळणार आहे. विशेष म्हणजे या कराराअंतर्गत फक्त बिअरच नव्हे तर ब्रिटनची अन्य उत्पादनंही स्वस्त होणार आहेत.

 

वाईन मात्र स्वस्त नाही

भारत आणि ब्रिटन यांच्यात 6 मे रोजी हा करार झाला. या करारात मात्र भारताने वाईनवर कसलीही करकपात केलेली नाही. बिअरवरच आयात करात कपात करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की भारतात बिअर आता स्वस्त मिळेल. वाईन मात्र आहे त्याच किमतीत मिळणार आहे.

 

स्कॉच व्हिस्की झाली स्वस्त

मुक्त व्यापार कराराअंतर्गत फक्त बिअरच नव्हे तर स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्कातही कपात करण्यात आली आहे. स्कॉच व्हिस्कीवरील 150 टक्के असलेला हा कर 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याशिवाय भारतातून ब्रिटनमध्ये जाणारे कपडे, चमड्याची उत्पादनं यावरील आयात शुल्कात कपात केली आहे. मुक्त व्यापाराच्या या करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार आहे.

 

भारतात बिअरची बाजारपेठ किती मोठी आहे?

भारतातील बिअरच्या बाजारपेठेचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. 2024 साली भारतीय बिअर बाजार साधारण 50 हजार कोटी रुपयांचा होता. यात दरवर्षी साधारण 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. वाढत्या बाजाराला शहरातील बदलती जीवनशैली आणि युवाकांचे वाढते प्रमाण या गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *