नवगण विश्लेषण

नारळ फोडणं अवघड, खोबरंही निघत नाही? १ ट्रिक, ५ मिनिटात करवंटीतून खोबरं बाहेर


नारळ हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ आहे (Coconut). नारळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये नारळाचा किंवा त्याच्या खोबऱ्याचा भरपूर प्रमाणात वापर होतो (Kitchen Hacks).

 

कधी भाज्यांसाठी वाटणामध्ये, कधी खोबऱ्याच्या चटणीसाठी (Kitchen Tips).

अशा अनेक गोष्टींमध्ये खोबऱ्याचा वापर होतो. खोबरं जितकं चवीला भन्नाट लागते. तितकेच करवंटीमधून खोबरं काढणं कठीण काम वाटते. नारळ सोलून त्याला खवून किंवा त्याला फोडून, आपटून तुकडे करुन चाकूने त्याचे खोबरे काढणे म्हणजे फार वेळखावू काम. जर आपटूनही नारळ फुटत नसेल, शिवाय करवंटीमधून खोबरं निघत नसेल तर, एक सोपा उपाय करून पाहा. या उपायामुळे करवंटीतून खोबरं काढणं सोपं होईल(How to OPEN A COCONUT & REMOVE COCONUT MEAT easily).

करवंटीतून खोबरं काढण्याची सोपी ट्रिक

– सर्वात आधी नारळ फोडून घ्या. नारळ आपटूनही फुटत नसेल तर, हातोडा किंवा वरवंट्याचा वापर करा. याच्या वापराने नारळाचे २ भाग होतील.

– नारळाचे २ भाग झाल्यानंतर त्याची शेंडी काढा.

– दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यावर चाळण ठेवा. चाळणीवर करवंटीची बाजू खाली ठेवून नारळ त्यावर ठेवा. आणि मग झाकण लावा.

– ७ ते १० मिनिटानंतर झाकण बाजूला काढून ठेवा. त्यातून करवंटी बाहेर काढून ठेवा. करवंटी काढण्यासाठी आपण चिमटीचा वापर करू शकता.

– करवंटी थंड झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने करवंटीतून खोबरं बाहेर काढा. या ट्रिकमुळे करवंटीतून खोबरं काढणं सोपं होईल.

– करवंटीतून खोबरं निघत नसेल तर, आपण नारळ गॅसवर भाजूनही खोबरं काढू शकता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *