pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर मुंडे समर्थकांचं आत्महत्या सुरू झालं. तर दुसरीकडे सोशल मीडियात काहींनी पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली.
या प्रकरणामुळे बीडमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. या सर्व घटना ताज्या असतानाच आता पंकजा मुंडे अन् प्रीतम मुंडे यांच्या बाबत सुषमा अंधारे यांनी एक विधान केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधाननंतर मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. आक्रमक मुंडे समर्थकांनी सुषमा अंधारे यांचा निषेध नोंदवत प्रतिकात्मक पुतळा जाळला.
सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवाबाबत वक्तव्य केले होते. यानंतर आता भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुषमा अंधारे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध नोंदवत घोषणाबाजी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, यंदाची लोकसभा निवडणूक जातीवादावर गेली नाही तर विकासावर गेली, इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोद्यात मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळे निष्कारण जातीवादाचं रुप देणं चुकीचं.
…आत्तापर्यंत त्यांचा कोणी हात धरला होता का?
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, परळीत आणि बीडमध्ये विकास झाला का? जी माणसं असं म्हणतात पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता, आत्तापर्यंत त्यांचा कोणी हात धरला होता का? असं म्हणत सुषमा अंधारेंनी थेट आता पंकजा मुंडेंना सवाल विचारला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या पुढे म्हणाल्या, ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदानं राहणारे लोक आहेत. यांच्या आडून राजकीय पुढारी आपला राजकीय स्कोअर सेटल करत आहेत. तो स्कोअर सेट करणं प्रचंड वाईट आहे. लोकसभा निवडणूक जातीवादावर गेली नाही तर विकासावर गेली आहे. इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळेच निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे.
“परळीत आणि बीडमध्ये विकास झाला का?
सुषमा अंधारे पुढे म्हणाले, जी माणसं असं म्हणतात की पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता.. आत्तापर्यंत कोणी त्यांचा हात धरला होता का? गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईनं पंकजा मुंडे आमदार झाल्या, ग्रामविकास मंत्रालय त्यांनी संभाळलं आहे. त्यांची बहिण प्रीतम मुंडे खासदार होत्या, का विकास केला नाही? परळीत एमआयडीसी का येऊ शकली नाही? प्रीतम मुंडे यांनी काय विकास केला? केवळ विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या.
आता आमदार संदीप क्षीरसागर यांना ओबीसींनी गावबंदी करायची, मराठा आणि ओबीसी दोषी वाटत नाहीत. या दोघांच्या आडून आपला राजकीय स्कोअर सेटल करणारे कोण आहेत? हे लोक शोधले पाहिजेत, थेट विकासाच्या मुद्द्यावर का बोललं गेलं नाही? असा सवालही यावेळी सुषमा अंधारेंनी विचारला आहे.