Navgan News

ताज्या बातम्या

संभाजीनगरमधील कार्यक्रमाला शिवसैनिकच नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केली खंत


 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा आज 38वा वर्धापन दिन आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात संजय राऊत यांनी संबोधित केले.संजय राऊत म्हणाले शिवसेना पक्ष नाही तर ज्वलंत विषय आहे. शिवसेनेला जे गद्दार सोडून गेले ते परत निवडून येणार नाहीत. शिवसेना धगधगता विचार आहे.

यावेळी संजय राऊत यांनी संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. सभागृहातील गॅलरी रिकामी असण्यावरुन त्यांनी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाला शिवसैनिक आले नाहीत त्याचे आत्मपरिक्षण करा, असे राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. राऊत म्हणाले, माझ लक्ष समोरच्या गॅलरीकडे आहे. मराठवाडा इतका मोठा आहे. यापूर्वी सुद्धा अनेक ८ जूनला आम्ही इथं उपस्थित होतो. मात्र समोरची गॅलरी कधी रिकामी दिसली नाही. प्रमुख नेत्यांनी यावर लक्ष द्याव. आत्मचिंतन कराव. पदाधिराऱ्यांनी येताना शिवसैनिक आणले नाहीत.

संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटावर टीका केली. शिवसेनेला सोडून गेलेले गद्दार पुन्हा निवडून येणार नाहीत. हे गद्दार पुन्हा राजकारणात दिसणार नाहीत, असे राऊत म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *