
मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात एका काळ्या म्हशीने चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. म्हशीने काळ्या नव्हे, तर चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे.
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात एका काळ्या म्हशीने चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. म्हशीने काळ्या नव्हे, तर चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. pic.twitter.com/mauiOquEJT
— News18Lokmat (@News18lokmat) December 5, 2022
या घटनेची परिसरात चर्चा रंगली असून पिल्लाला पाहायला लोक येत आहेत. म्हैस आणि रेडकू या दोघांची प्रकृती चांगली आहे.
पशुवैद्यकीय डॉक्टरांनी याबाबत बोलताना जणुकांच्या मिश्रणामुळे रंगावर परिणाम झाल्याचं सांगितलं आहे.
अंगावर किंवा डोक्यावर एखाद-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू अनेक जण पाहतात. मात्र, गाईच्या वासराप्रमाणेच अगदी पांढऱ्या शुभ्र रेडकाला म्हशीने जन्म दिला आहे. वडवळ येथील अल्पभूधारक शेतकरी राजकुमार कोटीवाले हे शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय करतात.
त्यांच्या म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. आतापर्यंत रेडकाच्या अंगावर एखादा पांढरा डाग असल्याचे अनेकांनी पाहिले होते, पण संपूर्ण रेडकूच पांढरे झाल्याची ही दुर्मिळ घटना आहे. या घटनेची परिसरात चर्चा होत आहे.