
तुळजापूर : शहरात एका फौजदाराचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला असून दुसरा पोलीस कर्मचारी जखमी आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. उपजिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल गंगाधर किरवाडे (वय 34) हे फौजदार मृत पावले आहेत तर योगेश हणमंत सूर्यवंशी (वय 38) हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना उस्मानाबादच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे
उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ. श्रीधर जाधव यांनी सांगितले की, श्री किरवाडे हे मृत आहेत. तर श्री सूर्यवंशी गंभीर जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथे हलविण्यात आले आहे. एका जिन्यावरून पडले असल्याची प्राथमिक आहे.






