Video : व्हिडिओ

Video इस्रोने पुन्हा केली कमाल ! पुष्पकची तिसरी यशस्वी लैंडिग करून रचला इतिहास


इस्रोच्या पुष्पक यानाचे अवतरण प्रयोग हवामानाच्या बदलामुळे रखडलेले होते. इस्रोने पुनर्वापर करता येणार्‍या प्रक्षेपण यानाच्या (RLV) अवतरणाच्या क्षेत्रातील तिसरा यशस्वी प्रयोग केला.

यावेळी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत स्वायत्त अवतरण (Autonomous Quotation) क्षमता पुष्पक यानाने दाखवून दिली.

ही चाचणी अंतराळातून परत येणार्‍या यानाच्या अवतरणासाठीच्या प्रक्रियेचे अनुकरण करते. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाने पुनर्वापर करता येणारे प्रक्षेपणयान (RLV) विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञानात इस्रोची आघाडी आणि विशेषज्ञता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

कर्नाटकातल्या चित्रदुर्ग येथील वैमानिक परीक्षण क्षेत्रात (ATR) रविवार सकाळी 7:10 वाजता ही चाचणी (LEX-03) पार पडली. यापूर्वी झालेल्या LEX-01 आणि LEX-02 चाचण्यांच्या यशानंतर आणखी आव्हानात्मक परिस्थिती (500 मीटरची बाजूकळ अंतर – LEX-02 पेक्षा जास्त) आणि तीव्र वारा असतानाही पुष्पक यानाने स्वायत्तपणे अवतरण केले, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

https://x.com/isro/status/1804709607576834363?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1804709607576834363%7Ctwgr%5E484c5fb50de5546ca078c7a5277cf423d9e8e410%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavgannews.in%2Fvideo%2F39375%2F

वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे 4.5 किलोमीटर उंचीवरून आकाशात सोडण्यात आलेल्या या पंख असलेल्या पुष्पक यानाने स्वायत्तपणे दिशा सुधारली आणि धावपट्टीवर अचूक असे क्षैतिज अवतरण केले. या विमानाच्या आकारामुळे अवतरणाचा वेग ताशी 320 पेक्षा जास्त होता. एखाद्या व्यापारी विमानापेक्षा (ताशी 260) आणि लढाऊ विमानापेक्षा (ताशी 280)ही जास्त होता, असे इसरोने नमूद केले.

अवतरणानंतर जमिनीवर येताना ब्रेक शेड वापरून यानाचा वेग ताशी 100 पर्यंत कमी करण्यात आला. त्यानंतर लँडिंग गियरच्या ब्रेकचा वापर करून विमान पूर्णपणे थांबवण्यात आले. यावेळी पुष्पक यानाने आपोआप आपले संतुलन राखून धावपट्टीवर सरळ रेषेत धाव घेतली.

ही चाचणी अंतराळातून परत येणार्‍या यानाच्या अवतरणाच्या प्रक्रियेचे अनुकरण करते. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाने पुनर्वापर करता येणारे प्रक्षेपणयान (RLV) विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञानात इस्रोची आघाडी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

 

या चाचण्यांद्वारे भविष्यातील अंतराळातून परतीच्या मोहिमांसाठी उपयुक्त अत्याधुनिक मार्गदर्शन प्रणालीही यशस्वीरीत्या वापरली गेली आहे.

पुष्पक यानाच्या या यशस्वी प्रयोगासाठी विक्रम साराभाई अंतराळ केंद्रासह (VSSC) अनेक इसरो केंद्रांनी (SAC, ISTRAC, SDSC) समन्वयाने काम केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *