Video : व्हिडिओराजकीय

हेच काँग्रेसचं कर्नाटक मॉडेल आहे का?गँगवॉर, तरुणीवर बलात्कार, मारहाण, हत्या, बॉम्बस्फोट, पाकिस्तान जिंदाबादचे नारे


कर्नाटकमध्ये गँगवॉरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

यामध्ये एका टोळक्याने एकमेकांवर तलवारीने वार केले. एवढंच नाहीतर एका जणाला कारखाली चिरडलं.

कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात ही घटना घडली आहे. या गँगवॉरचा भडका उडाल्याचं पहायला मिळालं. कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

या व्हिडीओमध्ये दोन वाहनांमधून आलेल्या काही तरुणांच्या टोळक्यांनी एकमेकांवर हल्ले केले असून एकमेकांवर वाहनं चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ तिथल्या एका रहिवाशाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली असून गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, सुरे, एक स्विफ्ट कार, दोन दुचाकी आणि इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहे.

गँगवॉरचा हा व्हिडीओ 18 मे रोजीचा असल्याचं सांगितला जात आहे. ही गँगवॉरची घटना उडप्पी आणि मणिपाल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. गुंडांनी आपली कार हायवेवर उभी केली आणि दुसऱ्या टोळीच्या गुंडावर हल्ला केला. कर्नाटकमधील कायदा सुव्यवस्थेबद्दलचा हा व्हिडीओ भाजपने शेअर केला आहे.

 

हेच काँग्रेसचं कर्नाटक मॉडेल आहे का?

गँगवॉर, तरुणीवर बलात्कार, मारहाण, हत्या, बॉम्बस्फोट, गांजा, ड्रग्स, रेव्ह पार्ट्या, पाकिस्तान जिंदाबादचे नारे, हे सगळं कर्नाटक सरकारच्या काळात सुरू आहे, असं म्हणत मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना टॅग करण्यात आलं. पोलिसांचा कुठेच धाक उरला नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं म्हणत भाजपने टीका केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *