Video : व्हिडिओराजकीय

Video पुण्याच्या सभेत अजितदादांचं पंतप्रधानांना गिफ्ट; पाहून मोदीही हसायला लागले


पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात जाहीर सभा घेतली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मत द्यायचं आवाहन केलं.

भाषण सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुरलीधर मोहोळ यांनी दिग्विजय पगडी देऊन स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीनही उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना तुकाराम महाराजांचा पुतळा दिला. त्याआधी अजित पवारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास गिफ्ट दिलं. हे गिफ्ट पाहून नरेंद्र मोदीही खळखळून हसले.

अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक फोटो फ्रेम दिली, या फ्रेममध्ये भाजपचं कमळ, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आहे. या तीनही पक्ष चिन्हांच्या खाली राम मंदिराचा फोटोही आहे. अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना या फोटोविषयी माहिती दिली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी खळखळून हसू लागले, ज्याला अजित पवारांनीही हसून प्रतिसाद दिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *