सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबात खळबळ उडाली आहे आहे. विवारी पहाटे अभिनेत्याच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींना गोळीबार केला आहे.
गोळीबाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत.
सलमान खानच्या घरासमोरील गोळीबाराच्या घटनेचा Exclusive Video pic.twitter.com/A8T55H1rDp
— News18Lokmat (@News18lokmat) April 14, 2024
बाईकवरून आलेल्या दोघांनी पाच ते सहा राऊंड फायर केले.
यातली एक गोळी सलमान खानच्या गॅलरीवरही झाडण्यात आली. बाईकवर आलेल्या या दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे त्यांचा चेहरा झाकलेला होता. या घटनेचा एक्सक्लूसिव व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये आरोपी गोळ्या झाडत असल्याचे दिसत आहे.
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या अज्ञातांची मोटरसायकल मुंबई पोलिसांना सापडली आहे. जप्त केलेल्या मोटारसायकलचा तपास फॉरेन्सिक टीम करत आहे. तर सलमान खानच्या घरात एक गोळी सापडली आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपी पश्चिम द्रुतगती मार्गाने दहिसरच्या दिशेने निघाले होते. पळून जाताना आरोपींनी स्थानिक लोकांना एक्स्प्रेस वेचा रस्ता विचारल्याचेही समोर आले आहे.
आरोपी बाहेर राज्यातून आल्याचा संशय
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबईच्या रस्त्यांची माहिती नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे आरोपी दुसऱ्या राज्यातून आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आतापर्यंत 50 हून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी मुंबई सेंट्रल येथून आल्याचे स्पष्ट झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल परिसरात गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत आहेत. क्राइम ब्रँचची टीम त्या ऑटोचालकाचा जबाब नोंदवणार आहे, ज्याला आरोपींनी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेकडे जाण्याचा मार्ग विचारला होता. आरोपीचे शेवटचे लोकेशन मुंबईतील विलेपार्ले येथे दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी मेहबूब स्टुडिओमार्गे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गेले.