सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. दररोज इथे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक लोक स्वत:च व्हिडीओ तयार करुन शेअर करत असतात. तर काही व्हिडीओ हे काही ठराविक प्रसंगाचे असतात.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील,काय स्टंटबाजी करतील ह्याचा काहीही नेम नाही !
०-३ वर्षांपर्यंत बाळाचे कान पूर्णपणे विकसित झालेले नसतात.मेंदूचा देखील पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेनुसार अशी लहान मुलं कर्णकर्कश आवाज सहन करू शकत नाहीत. pic.twitter.com/ShOjFuL10Y— 💪🔥 बबलु ❤️👑 (@Mayazayo) April 9, 2024
जे कोणा दुसऱ्या मार्फत व्हायरल केले जातात. असाच एक व्हिडीओ समोर आला, जो गुढीपाडव्याचा असल्याचं सांगितलं जात आहे.
नुकताच गुढीपाडवा पार पडला, ज्यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये नऊवारी साडीतील महिला, ढोलपथक आणि शोभायात्रा यांसारखे व्हिडीओ आहेत.
गुढीपाडव्याला बहुतांश लोक ढोलपथकांना मान देतात, तर अनेक लोक आवर्जून या ढोलपथकांमध्ये सहभागी होतात. ज्यामुळे अनेकदा लोकांना प्रसिद्धी मिळाली आहे. अशाच एका ढोलपथकातील महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ही महिला जोरदार ट्रोल होत आहे.
खरंतर ही महिला तिच्या लहान मुलासोबत ढोल वाजवत आहे, तिचं बाळ साधारण 2 ते 3 वर्षाचं असल्याचं म्हटलं जातं आहे. जे तिच्या खांद्यावर झोपलं आहे आणि त्या मुलासह ती महिला ढोल वाजवत आहे. ज्याकारणामुळे ती ट्रोल झाली.
इतक्या लहान मुलाला आपल्या जिद्दीसाठी त्रास देणं हे अमानवी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. वयाच्या ०-३ वर्षांपर्यंत बाळाचे कान पूर्णपणे विकसित झालेले नसतात.मेंदूचा देखील पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेनुसार अशी लहान मुलं कर्णकर्कश आवाज सहन करू शकत नाहीत. ज्यामुळे बाळ बहिरं देखील होऊ शकतं, असं एका युजरनं म्हटलं आहे.
तस काहींनी या महिलेनं काही व्ह्यूज आणि प्रसिद्धीसाठी केलं असल्याचं देखील म्हटलं आहे. पण यामुळे तिच्याच बाळाला त्रास होत असल्याचं देखील एकानं म्हटलं आहे.
तर एका युजरने, ‘तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो कृपा करून असे स्टंट करू नये तुमच्या बाळाच्या हृदयावर काय परिणाम झाले असतील हे येणारा काळच सांगेल त्या विचारा चिमुकल्याच्या कानाचे काय हाल झाले असतील ते त्याचं त्याला माहिती.’ असा रिप्लाय दिला आहे.
ही महिला पुण्याच्या अभेद्य पथकातील सदस्या आहे. पण हा व्हिडीओ नक्की कधीचा आहे? हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ गुढीपाडव्याचा असल्याचं म्हटलं आहे.