Video : व्हिडिओ

चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते याचा एक व्हिडीओ पहाच !


विज्ञान, तंत्रज्ञान दिवसेंदिवस वाढत असून तज्ज्ञ मंडळी नवनवे शोध लावत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं लोक आता चंद्रावर पोहोचले आहेत. आता लोकांना चंद्रावर कसं जग आहे, चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते असे अनेक प्रश्न असून त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

अशातच चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते याचा एक व्हिडीओ समोर आलाय. हे दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल.

आपण दररोज सूर्याला उगवताना मावळताना पाहतो. त्याचबरोबर चंद्रालाही पाहतो. मात्र सध्या चंद्रावरुन उगवत्या पृथ्वीचं चित्र समोर आलं आहे. हे दृश्य पाहून तुम्ही चकित व्हाल. चंद्रावरुन पृथ्वी खूपच नयनरम्य दिसत असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

अंतराळातून रेकॉर्ड केलेलं हे पृथ्वीचे दृश्य लोकांचं लक्ष वेधतंय. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चंद्राचा पृष्ठभाग खड्ड्यांचा दिसतोय. त्यानंतर निळ्या रंगाची गोलाकार पृथ्वी उगवताना दिसतेय. पृथ्वी अगदी संगमरवरी दगडासारखी दिसत आहे. ती हळूहळू वरच्या दिशेनं जाताना दिसतेय. हे दृश्य खूपच रोमांचक आहे.

@wonderofscience नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 36 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून लोकांनी हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केलंय.

दरम्यान, अंतराळाविषयी नेहमीच लोकांना उत्सुकता राहिली आहे. तिथे लोक कसे राहू शकतात, जेवण कसं बनवणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आतुर असतात. अंतराळातील बरेच व्हिडीओ सतत समोर येत राहतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *