Video : व्हिडिओ

कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच”


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. “मी माझ्या देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी मोठी लढाई लढत आहे. त्यामुळेच आज मोठे भ्रष्टाचारी तुरुंगात आहेत.

सर्वोच्च न्यायालयातूनही जामीन मिळत नाही. भ्रष्ट लोकांनी कान उघडे ठेवून ऐकावे, तुम्ही मोदींवर कितीही हल्ले केले तरी मोदी थांबणार नाहीत. भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, ज्याने देश लुटला त्याला ते परत द्यावच लागेल.”

“मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध पूर्ण ताकदीने लढत असताना त्यांनी इंडिया आघाडी केली आहे. त्यांना वाटतं मोदी घाबरतील… पण माझा भारत माझं कुटुंब आहे, अनेक भ्रष्ट लोक तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर होत नाही, काही ठिकाणी पलंग आणि भिंतींमध्ये चलनी नोटांचे ढीग सापडले आहेत. वॉशिंग मशीनमधून पैशांचे ढीग बाहेर पडत आहेत” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

“देशाच्या तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. 29 मध्ये हिशोब घ्या. भ्रष्टाचाराविरुद्ध मोठा लढा सुरू आहे. गरिबांचा पैसा कुणालाही हडप करता येणार नाही. साडेतीन लाख कोटींची बचत झाली. भ्रष्टाचार हटवण्याची मोदींची गॅरेंटी आहे, पण ते भ्रष्टाचार वाचवा असं म्हणतात. तेव्हा आता निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे.”

“देशात दोन लाखांहून अधिक गोदामं बांधली जात आहेत, तुमचा पैसा वाचवण्यासाठी एनडीए सरकार या दिशेने काम करत आहे. आम्ही एक नवीन योजना घेऊन येत आहोत, पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, तुमच्या घराचे वीज बिल शून्य होईल, प्रत्येक कुटुंबाला मोफत वीज मिळेल. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकार 75 हजार रुपयांची मदत देणार आहे. सरकार स्थापन होताच या कामाला गती देईन, हे भाजपाचे सरकार आहे.”

“देशातील पहिला नमो भारत कॉरिडॉर दिल्ली ते मेरठपर्यंत बांधण्यात आला आहे. मेरठ मेट्रोवर वर्क-एक्स्प्रेस मार्ग बांधला जात आहे, ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ बांधले जात आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होतील, भाजप, आरएलडी आणि घटक पक्षांनी मेहनत घेतली आहे. अरुण गोविल, राजकुमार सांगवान, संजीव बालियान, भाई चंदन, प्रदीप चौधरी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याची प्रार्थना करण्यासाठी मी आलो आहे. कितीही गरमी असली तरी मतदानासाठी बाहेर पडायलाच हवं. तुमचे मत विकसित भारतासाठी असेल” असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *