Video खलिस्तानींनी आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला, भुल्लरच्याही सुटकेची ऑफर केल्याचा दहशतवादी पन्नूनचा दावा
गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळ्यात अटक केली आहे.
यामुळे आम आदमी पक्ष वादाच्या कचाट्यात अडकला गेलाय. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूनने आम आदमी पक्षाबद्दल मोठे विधान केले आहे.
खलिस्तानी दहशतवादी पन्नूनने म्हटले की, आम आदमी पक्षाला वर्ष 2014 ते 2022 दरम्यान 16 दशलक्ष रुपये दिले. यामुळे पक्षाच्या आर्थिक अखंडतेसह अतिरेकी संघटनांनी संबंध असल्याचा प्रश्न उभा राहत आहे.
खलिस्तानी दहशतवादी पन्नूचे अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप
पुढे पन्नूनने आरोप केलाय की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आर्थिक लाभाच्या बदल्यात दोषी दहशतवादी रेविंदर पाल सिंह भुल्लरची सुटका करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. खरंतर, भुल्लर दिल्लीतील वर्ष 1993 मधील बॉम्बस्फोटातील दोषी आढळला होता.
याशिवाय दहशतवदी पन्नूनने आरोप आरोप केला आहे की, वर्ष 2014 मध्ये गुरुद्वारा रिचमंड हिल्स, न्यूयॉर्क येथे केजरीवाल आणि खलिस्तान समर्थक शीख यांच्यात एक गुप्त बैठक झाली होती. या भेटीदरम्यान केजरीवाल यांनी आर्थिक पाठबळाच्या बदल्यात दहशतवादी भुल्लरची सुटका करण्याचे वचन दिले होते.
लोकसभेसाठी आम आदमी पक्षाची तयारी
लोकसभेसाठी आम आदमी पक्षाकडून “मै भी केजरीवाल” (Main Bhi Kejriwal) कॅम्पेन चालवले जाणार आहे. यासाठी जोरदात तयारी करण्यात आली आहे. दिल्लीत ठिकठिकाणी कॅम्पेनचे घोषवाक्ये लिहिण्यात आलेले स्टिकर्स तयार करून वाहनांवर चिकटवण्यात आले आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.
BIG claim by US based Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannun says Aam Aadmi Party took $16 million between 2014-2022 from Khalistans.
Pannun Claims Delhi CM Kejriwal had a meeting with Pro Khalistan groups in Gurdwara Richmond Hills, NY in 2014 where Kejriwal promised to… pic.twitter.com/xzzo2MxsQS
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) March 25, 2024
इंडिया आघाडीची महारॅली निघणार
येत्या 31 मार्चला इंडिया आघाडीच्या महारॅलीचे आयोजन दिल्लीतील रामलीला मैदानावर करण्यात आले आहेत. या महारॅलीला आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे नेते उपस्थिती लावणार आहेत. याशिवाय आम आदमी पक्षाचे सरचिटणीस डॉ. संदीप पाठक यांनी म्हटले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच 31 मार्चच्या महारॅलीचा आदेश दिला आहे.