परिपोषण आहार अनुदानास मंजुरी राज्य सरकारने राज्यमाता गोमातेला प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान जाहीर
परिपोषण आहार अनुदानास मंजुरी राज्य सरकारने राज्यमाता गोमातेला प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान जाहीर म्हणजे महिन्याला दीड हजार रुपये एका गाईला आर्थिक मदत करण्यात येणार अशी माहिती राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर
महात्मा गांधीजी जयंती या अनुषंगाने आज राष्ट्रजन प्राणीमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रणित गौरक्षक सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने गो शाळेतील राज्यमाता गोमातेला आर्थिक मदत चाऱ्या पाण्यासाठी द्या म्हणून अनेक मागणी करण्यात आली होती तीच मागणी राज्य सरकारने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे राज्य शासनाचे स्वागत व अभिनंदन करण्यात तसेच गो सेवकांच्या मागणीस यश आल्याबद्दल खालील परिपोषण आहार अनुदानासाठी मंजुरी जाहीर करण्यात आली गोशाळेतील भारतीय गोवंशांच्या भाकड,वयोवृद्ध गायींच्या दररोजच्या चारा-पाण्यासाठी राज्यशासनाने प्रति दिन प्रति गोवंश 50 रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
या अनुदानामुळे गोशाळेतील भारतीय गोवंश सांभाळणार्या सर्व गोसेवकांना गोसंवर्धनासाठी मदत तर होणारच आहे त्याशिवाय कसायाकडे जाणार्या एकही गोवंश न जाण्याचा आपला जो ठाम आग्रह असतो त्यादृष्टीनेसुद्धा हे अत्यंत महत्वाचे असे पाऊल आहे.
खर्या अर्थाने सर्व देशी गोवंशांचा आणि गोवंशांचा सांभाळ करणार्यांचा सन्मान यानिमित्ताने शासन दरबारी झाला आहे असे मला वाटते. जसा लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये महिना चालू केला तसाच राज्यमाता गोमातेला दीड हजार रुपये महिना राज्य सरकारने चालू केलेला आहे त्याचा लाभ ही सर्वांनी गोशाळेतील गोसंचालक चालक-मालक यांनी यांचा लाभ घ्यावा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्य गौसेवा आयोगाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले गो प्रेमी शेखरजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनात यांच्या पुढाकारातून प्रत्येक गोशाळेतील गो गाईंसाठी प्रतिदिन पन्नास रुपये म्हणजे महिन्याला एका गाईला दीड हजार रुपये महिना लागू करण्यात आला त्याचा लाभ सर्व गोशाळेतील गोसेवक गो संस्थानी घ्यावा अशी आव्हान राष्ट्र जन प्राणिमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशनचे प्रदेश संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली