Social Viral News

मित्राच्या सांगण्यावरून नवरदेवाने बनवला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO; अन घडलं ते…


मुलांची मैत्री मुलींच्या मैत्रीपेक्षा खूप घट्ट असते असं म्हणतात. मुलं मैत्रीसाठी काहीही करू शकतात. असंच एक प्रकरण. एका मुलाला त्याच्या मित्राने त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शूट करायला सांगितला.

त्या मुलाने तसं केलंसुद्धा त्याने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शूट केला. पण त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.

 

लग्नाची पहिली रात्र नवविवाहित दाम्पत्यासाठी खास असते. लग्नाचा हा खासगी क्षण. पण एका व्यक्तीने आपल्या मित्रासाठी लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शूट केला. त्याच्या मित्राने त्याला सुहागरातचा व्हिडीओ शूट करायला सांगितलं आणि त्याने तसं केलं. त्यानंतर ही व्यक्ती चांगलीच अडकली आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधून ही धक्कादायक घटना आहे.

 

वराने त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून त्याच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ शूट केला, मात्र त्यानंतर तोच मित्र त्याला ब्लॅकमेल करू लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराने त्याचा मित्र शिवम मिश्राच्या सांगण्यावरून गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. नंतर शिवमने फसवणूक करून हा व्हिडिओ मिळवला आणि वराकडे पैशांची मागणी करू लागला. शिवमने त्याच्या मित्राकडे अनेक वेळा पैसे मागितले आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

 

या प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी शिवम मिश्राविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. ही घटना केवळ मैत्रीचा विश्वासच तोडत नाही तर काही लोक लालसेपोटी इतरांचं कसं शोषण करू शकतात हे देखील दाखवते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *