Social Viral News

आधी इंस्टाग्रामवर मैत्री मग तरुणीनं रात्री घरी भेटायला बोलावलं, Room मध्ये शिरताच घडल काय ?


डिजिटल युगात प्रत्येक चुकीची किंमत मोजावी लागते, मग ती कोणतीही गोष्ट का असेना. टेक्नोलॉजी सुधारत चालली आहे, जे एकाअर्थी माणसासाठी चांगलं आहे, पण यामुळे फ्रॉडच्या केसेसही मागच्या काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत.

असंच एक प्रकरण बाडमेर येथील एका शिक्षकासोबत घडलं आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेरमधील कायम का तला येथील एका शिक्षकाला त्याच्या माजी विद्यार्थिनीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हनीट्रॅपमध्ये अडकवले.

 

शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) मुकेश कुमार या शिक्षकाने माजी विद्यार्थिनी रामेश्वरीला इन्स्टाग्रामवर संदेश पाठवला. त्यानंतर रामेश्वरीने अश्लील फोटो पाठवून शिक्षकाला जाळ्यात ओढले. तिचा मित्र पपुराम याने या संधीचा फायदा घेण्याचा कट रचला.

 

एका विद्यार्थीनीने आपल्या शिक्षकासोबत असा प्रकार केल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकाचं पवित्र नातं, एका वेगळ्याच वळणावर गेलं.

 

विद्यार्थीनी आधी आपल्या शिक्षकाला दररोज अश्लील फोटो पाठवत, ज्यामुळे शिक्षकाच्या भावना ही जागृत झाल्या, त्याच्या मनात तरुणीला भेटण्याची इच्छा झाली. अखेर जेव्हा 22 ऑक्टोबरला रात्री 12:30 वाजता शिक्षकाला विद्यार्थीनीने भेटायला बोलावलं, ज्यामुळे तो खूप खूश झाला. पण त्याच्यासोबड घडलं भलतंच.

 

शिक्काला विष्णु कॉलनीत बोलावून त्याला किडनॅप केलं. पपुराम, धोळाराम, कालूराम आणि हनुमानराम या चौघांनी शिक्षक आणि त्या मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवला. आणि 21 लाख रुपयांची खंडणी मागितली, नंतर 5 लाखांवर तडजोड झाली.

 

शिक्षकाच्या कुटुंबीयांनी बाडमेर पोलिसांशी संपर्क साधला. बाडमेर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर थार हॉस्पिटलजवळ सापळा रचून आरोपींना पकडले. सर्व आरोपींसह त्या मुलीलाही अटक करण्यात आली.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *