शेत शिवार

रात्री यायचे आवाज; लोकांना वाटलं भूत, एक दिवस जाऊन पाहताच गावकरी शॉक..


निसर्गाने मानव आणि प्राणी यांच्यात समतोल राखून जग निर्माण केलं आहे. पण माणसाने आपल्या लोभापोटी जंगलं तोडली. त्यामुळे मनुष्यवस्तीत प्राणी दिसू लागले आहेत. अन्नाच्या शोधात हे प्राणी जंगलं सोडून वस्तीत येऊ लागले आहेत.

अनेक वेळा हे प्राणी जंगलांच्या जवळ असलेल्या ग्रामीण भागातही दिसतात.

मध्य प्रदेशातील नर्मदापुरमजवळील एका गावात गेल्या अनेक दिवसांपासून लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. इथं गावकऱ्यांना रात्रीच्या शांततेत विचित्र आवाज ऐकू यायचे. अनेकांनी याचा संबंध भूतांशी जोडला. लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं होतं. पण अखेर बऱ्याच दिवसांनी यामागचं गुपित उघड झालं.

हे प्रकरण नर्मदापुरममधील भिलखेडी गावचं आहे. इथे बरेच दिवस शेतामधून काहीतरी आवाज येत होता. एक-दोनदा लोकांनी तिथे साप पाहिला होता. पण आवाज बराच मोठा होता. विशेषतः रात्रीच्या शांततेत तो जास्तच मोठा वाटायचा. अशा स्थितीत लोक त्याला भूत मानत होते. लोकांनी रात्री घराबाहेर पडणं बंद केलं होतं. मात्र रविवारी अखेर लोक या भुताला सामोरे गेले. हे भूत दुसरं कोणी नसून दहा फूट लांब अजगर होता. हा अजगर शेतात लपून बसला होता. जो महिलेनं शेतात काम करताना पाहिला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गावातील शेतात काम करत असताना एका महिलेला एक महाकाय अजगर दिसला. हा अजगर शेतात लपून बसला होता. त्याला पाहताच महिलेने तिथून पळ काढला. यानंतर ग्रामस्थांना याबाबत माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी साप रेस्क्यू टीमला पाचारण केलं, त्यांनी येऊन दहा फूट लांबीच्या अजगराला पकडलं. अजगराला जवळच्या जंगलात सोडण्यात आलं. साप पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *