राजकीय

शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी


Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१५ ऑक्टोबर) रोजी महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अनेक दिवसांपासून या निवडणूकांच्या तारखांची सर्व राजकीय पक्षांकडून वाट पाहिली जात होती.

दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा करण्यात आले आहे.

 

यादरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषददेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह फ्रीज करणार का? कारण तशी अशी शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती.

 

यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 मागण्या केल्या होत्या, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठं करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. lj दुसरी मागणी त्यांनी पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह फ्रीज करण्याची केली होती. पहिली मागणी आम्ही मान्य केली आहे. आम्ही त्यांना लिखित स्वरूपात विचारल होतं की तुमचं चिन्ह कसं असाव ते सांगा.. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे. पिपाणी हे चिन्ह पूर्ण वेगळं आहे… त्याला आम्ही हात लावला नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.

 

निवडणुकीचा कार्यक्र कसा असेल?

२२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे

३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर असणार आहे।

महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी होईल

मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *