राजकीय

इंडिया आघाडीला पहिला जोर का झटका,बड्या पक्षाचा काँग्रेसला टाटा, बाय बाय…


लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्षाचा समावेश करण्यात आला होता. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर भाजपविरोधात लढण्यासाठी पक्षाने काँग्रेससोबत युती केली.

दिल्लीच्या सात जागांपैकी आम आदमी पक्षाने चार तर काँग्रेसने तीन जागा लढविल्या होत्या. मात्र, येथील सातही जागांवर भाजप उमेदवार निवडून आले. या मोठ्या अपयशानंतर लोकसभा निवडणुक निकालाच्या तिसऱ्याच दिवशी ‘आप’ने काँग्रेसला टाटा, बाय बाय करत एकट्यानेच पुढे जाण्याची घोषणा केली. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची जाहीर घोषणा केली.

दिल्लीतील सातही जागांवर झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अर्विनाद केजरीवाल यांच्या घरी पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पक्षांचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी आपल्या पक्षाने विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेससोबतची युती ही केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार आहे. लोकसभा निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे एकत्र लढलो. पण, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमची युती नाही. दिल्लीच्या जनतेसोबत मिळून आम्ही ही लढाई लढू आणि जिंकू. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून हे स्पष्ट झाले आहे की लोकसभा निवडणुकीसाठी भारत आघाडीची स्थापना झाली होती. त्यामुळे आम्ही एकत्र लढलो. जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे. यासाठी कोणतीही युती झालेली नाही. आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे, असे ते म्हणाले.

केजरीवाल यांनी आधीच संकेत दिले होते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जूनपर्यंत कोर्टाने जामीन दिला होता. पण, पुन्हा तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससोबतची मैत्री भविष्यात संपुष्टात येऊ शकते, असे संकेत दिले होते. काँग्रेससोबत आमचा कोणताही कायमचा विवाह नाही. आमचे लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेजही नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपला पक्ष महाआघाडीत सामील झाला होता असे ते म्हणाले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *