Video : व्हिडिओमुंबई

Video बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात भीषण स्फोट,संपूर्ण परिसर हादरला


पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील मोल्टास कारखान्यात शनिवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसराला हादरले बसले.

स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली. आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत मोल्टास हा कारखाना आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात काही कामगार काम करीत होते. त्याचवेळी अचानक भीषण स्फोट होऊन कारखान्याला मोठी आग लागली.

आग इतकी भीषण होती, की आगीचे आणि धुराचे लोळ लांबच लांब पसरले. दरम्यान, आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी वेळीच बाहेर धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. धुराचे लोट पाहून अनेकांनी परिसरातून पळ काढला.

दरम्यान, स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *