मराठ्यांना मिळणार वेगळं आरक्षण, आधीच्या आरक्षणासारखंच पुन्हा आरक्षण
मराठा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.’हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत, गेले सात दिवस ते सलग उपोषण करत आहेत. त्यातचं त्याची तब्येत खालावली असून हायकोर्टाच्या आदेशाने त्यांनी सलाईन लावली…पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे…सगेसोयऱ्यांची अट मान्य होईपर्यंत त्यांचं उपोषण सुरू राहणार असंही ते म्हणाले.
पण….आधीच्या आरक्षणासारखंच मराठ्यांना पुन्हा आरक्षण मिळणार? मिळणार आरक्षण कोर्टात टिकणार? या सर्वांची प्रश्न येणारा काळचं देऊ शकेल. Special Report | मराठा समाजाला मिळणार वेगळं आरक्षण, आधीच्या आरक्षणासारखंच पुन्हा आरक्षण