Manoj Jarange Patilलोकसभा निवडणूक

Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मनोज जरांगे संतापले; मराठा सोडून 15 जाती ओबीसीत घेतल्या, हा आमचा फायदा आहे का?


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकची घोषणा झाली आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली आहे.

या बैठकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे का, उमेदवार पाडायचे, याचा निर्णय घ्यायचा असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

 

महायुती सरकारची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरील एका प्रश्नावर म्हटले की, मराठा समाजाला देणारे कोण आणि फसवणारे कोण हे समोर आले आहे. त्यावर मनोज जरांगे संतप्त झाले. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेना आरक्षण देऊ दिले नाही, असा आरोप मनोज जरांगेनी भाजपवर केला. आता मराठा आरक्षणावर बोलून काही फायदा नाही. त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले आहे. जर ते म्हणतात आमचा फायदा झाला आहे, तर दीड लाख मराठा तरुणांवर केसेस दाखल झाल्या, त्यांना नोकरी लागणार नाही, हा आमचा फायदा आहे का? शेकडो तरुणांनी मराठा आरक्षणासाठी जीव दिला हा आमचा फायदा आहे का? आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या हा आमचा फायदा आहे का? आम्हाला सांगितले की महाविकास आघाडीकडून लिहून आणा, आणि आता 15 जाती ओबीसीत घातल्या. आमच्या पोरांचं वाटोळं केलं, हा आमचा फायदा आहे का? एसईबीसीचं आरक्षण आम्ही मागितलं नाही ते आमच्यावर लादलं. आमचं ईडब्लूएस काढून घेतलं, हा आमचा फायदा आहे का? सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट आणलं नाही, फडणवीसांनी आणू दिले नाही, हा आमचा फायदा आहे का? गावागावात ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये छगन भुजबळांच्या माध्यमातून फडणवीसांनी भांडण लावून दिले हा आमचा फायदा आहे का?

 

शिंदे समितीला मुदतवाढ दिली पण ते कामच करत नाही, हा आमचा फायदा आहे का? नॉन क्रिमिलिअरची मर्यादा ओबीसींसाठी वाढवली, त्यात मराठ्यांचा समावेश नाही, हा आमचा फायदा आहे का? मुलींना मोफत शिक्षण दिले, त्यात आमच्या मुली बसत नाही, हा आमचा फायदा आहे का? शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देणार होते, ती दिली नाही, हा आमचा फायदा आहे का? असे संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केले.

 

आमच्या जातीवर कसं पोतारे फिरवले आणि सगळ्या जातींना कसे महामंडळ द्यायला लागले हे सगळ्यांना कळत आहे. ओबीसी देखील तुमच्यासोबत नाहीत, आम्ही तुम्हाला आतून भूयार पाडू. 20 तारखेला ठरणार आहे लढायचे की पाडायचे. थोड्याच दिवसांत तुम्हाला कचका कळेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *